अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांच्या घरी चिमुरड्या पाहुण्याचे आगमन

५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री खुशबू तावडे हिचा वाढदिवस असतो आणि याच आनंदाच्या दिवशी तिने ती आणि अभिनेता संग्राम साळवी आई बाबा होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. आम्ही आमच्या कुटुंबात थोड अजुन प्रेम अॅड करतोय असे कॅप्शन देत ही बातमी तिने शेअर केली आणि त्यांनंतर तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम देखील खुप सुंदर पद्धतीने पार पडलेला दिसून आला.

२ नोव्हेंबर रोजी खुशबू आणि संग्रामच्या घरी एक चिमुरडा पाहुणा आला. ज्याच नाव त्यांनी राघव अस ठेवल आहे. आजच्या बालदिनाच औचित्त साधत तिने तिच्या बाळाच्या हातांचा फोटो शेअर करत त्याचे नाव आणि आम्हाला निवडल्याबद्दल थॅंकु असे कॅप्शन देत ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली.या फोटोवर चाहत्यांसह सहकलाकारांनी देखील खुशबू आणि संग्रामवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

AtoZ Marathi कडून खुशबू आणि संग्रामचे खुप खुप अभिनंदन .

Leave a Comment

Exit mobile version