Sangram Salavi Entry: देवयानी च्या संग्राम ची या मालिकेत जबरदस्त एंट्री!

Sangram Salavi Entry : गेल्या काही वर्षांपासून मराठी मनोरंजनात टीआरपीसाठी चढाओढ रंगली आहे. अनेक वाहिन्या प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी आणि शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेतून अनेक उत्कृष्ट मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यातच, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान राखून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं आहे.

नवीन वर्षातही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना खुला केला आहे. अनेक नव्या मालिका आणि कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. यातच, ‘देवयानी’ सारख्या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ या नवीन मालिकेद्वारे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुनरागमन करत आहे.

Sangram Salavi New Malika

या मालिकेचं प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. शिवानी सुर्वेचा धाडसी आणि ग्लॅमरस लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही एक विनोदी आणि रोमँटिक मालिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.  यात शिवानी सुर्वेसोबतच, अभिनेता समीर परांजपे प्रमुख भूमिकेत आहे.

‘देवयानी’ मालिकेनंतर शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे . या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Thod Tuz Thod Maz

‘देवयानी’ सारख्या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ या नवीन मालिकेद्वारे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुनरागमन केल्यानंतर आता ‘देवयानी’ मधील तिचा सहकलाकार संग्राम साळवीही लवकरच ‘स्टार प्रवाह’वर एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.

‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आता लवकरच या मालिकेत ‘देवयानी’ फेम प्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवीची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

हे पण वाचा :

Tharal Tar Mag New Promo: सायली प्रतिमा जिवंत आहे हे सिद्ध करणार, अर्जुन सायलीला बजावणार

Kiran Gaikwad News : पत्र्याच्या घरात जन्म झाला ,जन्मतारीख सुद्धा माहित नाही , किरण गायकवाडच्या दारिद्र्याची कहाणी..

Bigg Boss Marathi 5 Update : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी.. आता फक्त

‘देवयानी’ मालिकेतील राघवच्या भूमिकेद्वारे घराघरांत पोहोचलेला संग्राम, “तुमच्यासाठी कायपण” या सुपरहिट संवादासाठी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘देवयानी’ आणि ‘कुलस्वामिनी’ सारख्या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर जवळपास ६ वर्षांनंतर संग्राम आता पुन्हा एकदा ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेद्वारे ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करणार आहे.

Devyani Sangram and Devyani

संग्राम साळवी यांच्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील एन्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत तो कोणती भूमिका साकारणार आहे आणि त्याची एन्ट्री कधी होणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये अभिनेता संग्राम साळवीची धमाकेदार एन्ट्री

स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये अभिनेता संग्राम साळवीची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. ‘देवयानी’ मालिकेतील राघवच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला संग्राम जवळपास ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’वर येणार आहे.

या मालिकेत होणाऱ्या एन्ट्रीविषयी बोलताना संग्राम म्हणाला, “मी ‘स्टार प्रवाह’ कुटुंबाचा जुना सदस्य आहे. या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा मला खूप आनंद आहे. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही प्रेक्षक ‘देवयानी’ मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात. ‘तुमच्यासाठी कायपण’ हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी करतात. इतक्या वर्षांनंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून मी भारावून जातो.”

“येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे. खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतील बरेच बारकावे हळूहळू आत्मसात करतोय. मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद अन् प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन,” असं संग्राम पुढे म्हणाला.

Yed Lagal Premach

येड लागलं प्रेमाच ही मालिका स्टार प्रवाह रात्री १० वाजता प्रसारित होते. या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत काही काळासाठी बिग बॉस फेम अभिनेता जय दुधाणे ने देखील काम केलं आहे. 

Leave a Comment

Exit mobile version