Kiran Gaikwad News : पत्र्याच्या घरात जन्म झाला ,जन्मतारीख सुद्धा माहित नाही , किरण गायकवाडच्या दारिद्र्याची कहाणी..

Kiran Gaikwad News : आपल्या पहिल्याच मालिकेमुळे किरण गायकवाड प्रसिद्ध झोतात आला. त्याच्या पहिल्या मालिकेत म्हणजे लागिर झाल जी मालिकेत त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. तस तर मनोरंजन क्षेत्रात नकारात्मक अश्या भूमिकांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. परंतु किरण च्या बाबतीत अगदी उलट घडलं,

लागिर झाल जी या मालिकेत किरण गायकवाड ने नकारात्मक अशी भैय्या साहेबांची भूमिका  साकारली होती. त्याची ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. आणि त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर ही भूमिका इतकी सहज रित्या निभावली की प्रेक्षक त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील भैय्या साहेब असच म्हणू लागले.

Kiran Gaikwad Biography

लागिर झाल जी या मालिकेनंतर किरण गायकवाड ने देवमाणूस ही झी मराठी ची मालिका केली. आणि या मालिकेमुळे किरण ला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. मालिकेतील त्याच्या पात्रा वर भरभरून मेम्स बनल्या.. सोशल मीडिया वर त्याच्या पात्राची खूप चर्चा झाली.

किरण गायकवाड ने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजन क्षेत्रात आपलं नाव कमावल खर, परंतु त्याचा हा प्रवास खूप खडतर होता. 

अत्यंत गरीबीची परिस्थिती असताना सुद्धा किरण ने त्यावर मात करत आपलं नाव कमावल आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 

किरण गायकवाड ने नुकतच त्याने एक मुलाखत दिली आहे त्यात त्याने अनेक धक्कादायक अशे खुलासे केले आहेत . या मुलाखतीत त्याने आपल्या पर्सनल आयुष्याबाबतीतल्या खूप काही गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.

लहानपणाबद्दल बोलताना किरण ने सांगितल आहे की, मला माझी खरी जन्मतारीख माहीत नाहीये. जी आहे ती शाळेत जाण्यासाठी लागते म्हणून , अशीच नोंदवली गेली आहे.

किरण पुढे म्हणाला, माझ्या जन्मा अगोदर माझे आई वडील पुण्यात आले, आणि स्थायिक झाले. तसा माझा जन्म घरीच झाला आहे. माझे बाबा एका ठिकाणी वॉचमन ची नोकरी करत होते. माझी जन्मतारीख सुद्धा खरी नाहीये. आपल्याला मुलगा झाला याचा माझ्या आई बाबांना खूप आनंद झाला. या आनंदात माझ्या बाबांनी खूप दिवस पार्टी केली आणि ते माझी जन्मतारीख नोंद करायची विसरून गेले.

माझी आई निरक्षर असल्याने तिनेही जन्मतारखेची नोंद केली नाही. जेव्हा शाळेत जायची वेळ आली तेव्हा, जन्मतारीख लागते आणि अशीच कोणती तरी जन्मतारीख नोंद केली गेली. नोंद केलेली जन्मतारीख १२ जून आहे.

आणखी वाचा :

Bigg Boss Marathi 5 Update : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी.. आता फक्त

Tharal Tar Mag MahaEpisode Twist : ठरलं तर मग मध्ये आखे तो क्षण आलाच! सायली आणि प्रतिमाची भेट होणार.. रहस्य उलगडणार…

Shreya Bugade on Nilesh Sabale : यामुळे श्रेया बुगडे ने निलेश साबळे बरोबर पुन्हा काम करायला नकार दिला..

लहपणात मी खूप मजा केली आहे. खूप लवकरच मला सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागली. त्यामुळे मी नीट वागायला शिकलो.

किरण गायकवाड आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करताना दिसला आहे. त्याने फकाट, चौक, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटामध्ये काम केलं आहे.

किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे यांच्या अफेअर च्या चर्चा खूप वेळा सोशल मीडिया वर येत राहतात. परंतु दोघांनीही याला कधीही दुजोरा दिला नाही. 

Leave a Comment

Exit mobile version