Tharal Tar Mag MahaEpisode Twist : ठरलं तर मग मध्ये आखे तो क्षण आलाच! सायली आणि प्रतिमाची भेट होणार.. रहस्य उलगडणार…

Tharal Tar Mag MahaEpisode Twist : ठरलं तर मग मध्ये आखे तो क्षण आलाच! सायली आणि प्रतिमाची भेट होणार.. रहस्य उलगडणार…स्टार प्रवाह वरील मालिका ठरलं तर मग सतत टीआरपी च्या शर्यतीत अव्वल स्थानावर असते. मालिकेच कथानक रंजक राहाव म्हणून सतत काही ना काही ट्विस्ट या मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. 

अर्जुन आणि सायली च्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. सायलीची भूमिका जुई गडकरी तर अर्जुन ची भूमिका अमित भानुशाली साकारत आहे. या मालिकेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच खूप सारे रहस्य होते आणि त्यामुळेच मालिका खूप मनोरंजक बनत गेली.

ठरलं तर मग मालिकेत प्रतिमा जिवंत आहे की नाही, साक्षी ने केलेला खून, मधुभाऊ वर खुनाचा आरोप, सायलीच खरी ओळख असे अनेक सस्पेन्स  आहेत. 

अद्याप तरी या सर्व गुपितांवरून पडदा हटलेला नाहीये. सायली आणि सायलीची खारी आई म्हणजे प्रतिमा यांची भेट व्हावी आणि प्रतिमा जिवंत आहे हे सगळ्यानं समजावं, याची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.

लवकरच या मालिकेमध्ये हे चित्र पाहायला भेटणार आहे. सायली हीच खरी प्रतिमा ची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रतिमा आणि सायलीची भेट व्हायला हवी. मालिकेपासून कित्येक दिवस दूर गेलेली प्रतिमा आता मालिकेमध्ये परत आली आहे. 

Tharal Tar Mag MahaEpisode Twist

येत्या २१ जुलै ला ठरलं तर मग मालिकेचा महाएपिसोड टेलिकास्ट होणार आहे. या एपिसोड मध्ये सायली आणि प्रतिमाची भेट होणार आहे. या मुळे प्रतिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर बऱ्याच दिवसांनी मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

ठरलं तर मग मालिकेचा महा एपिसोड चा प्रोमो समोर आला असुन प्रेक्षक ते पाहून महा एपिसोड पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. 

या महा एपिसोड च्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे की सायलीला अर्जुन आणि तन्वी म्हणजेच प्रिया मधील जवळीक अजिबात आवडत नाही. अर्जुन आणि प्रियाला एकत्र पाहून सायली खूप चिढते. ती रस्त्यावरून घाईघाई ने चालत असताना अर्जुन तिच्या मागे येऊन तिची समजूत घालण्याचा प्रयत्न  करत असतो.

तेवढ्यात सायलीला एक बाई रस्ता क्रॉस करताना दिसते. मागून येणाऱ्या वाहनांकडे त्या बाई च अजिबात लक्ष नसत. सायली जोरात “माई” अस ओरडते आणि त्या बाईला धक्का देऊन तिचा जीव वाचवते. ती बाई दुसरी तिसरे कोणी नसून प्रतिमाच असते. 

Tharal Tar Mag New Twist

सायली ज्यावेळेस प्रतिमाचा चेहरा पाहते तेव्हा तिला आधी ती नेमकी कोण आहे ते समजत नाही, मात्र थोड्या वेळाने सायली ला जाणवत की तिने या बाईला कुटेतरी पाहिलं आहे. म्हणून ती पुन्हा एकदा तिला माई म्हणून हाक मारते आणि तिला थांबवते. 

प्रोमो मध्ये सायली आणि प्रतिमा समोरा समोर तर आल्या आहेत, पण त्यांची भेट होणार की नाही याची उस्तुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या आधी देखील असे प्रसंग मालिकेमध्ये आले होते परंतु दोघींची भेट मात्र कधीच झाली नव्हती.

या वेळेस सायली आणि प्रतिमा यांची भेट होईल की नाही हे पाहण खूपच मनोरंजक असणार आहे. 

आणखी वाचा :

Shreya Bugade on Nilesh Sabale : यामुळे श्रेया बुगडे ने निलेश साबळे बरोबर पुन्हा काम करायला नकार दिला..

आनंदीची पुन्हा एकदा मन धागा धागा जोडते नवा मालिकेत एंट्री!

Pirticha Vanva Uri Petala: अखेर पिरतीचा वणवा उरी पेटला आणि रमा राघव मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं सर्वांसमोर..

Leave a Comment

Exit mobile version