6 वर्षे रिलेशनमध्ये राहूनही रेवती – आदिशचं झालं ब्रेकअप?

अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य हे गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. दोघेही एक आयडियल कपल सारखे राहायचे. दोघेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करायचे. मराठी सिनेसृष्टीतिल नेहमी चर्चेत राहणारे कपल म्हणजे रेवती आणि आदिश. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या दोघांत काहीतरी बिनसले आहे, अशी सर्वत्र चर्चा होती.

रेवतीला एका इंटरव्ह्यु मध्ये विचारले असताना खासगी आयुष्याबद्दल मला सर्वांसमोर चर्चा करायची नाही असे तिने सांगितले. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोलायच नाही. आमच्यात काही गोष्टी घडल्यात पण माझ्या खासगीआयुष्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी मला बोलायचे नाही. नेटकरी आमच्या विषयी बरेच काही लिहितात, पण मला काहीही बोलायचे नसून, मी सध्या आनंदी आहे. मला माझे कुटुंब आणि मित्र खुप आधार देत आहेत, असे देखील तिने म्हटले आहे.

रेवती आणि आदिश यांना तुम्ही लग्न कधी करणार ?असं विचारल्यानंतर ते म्हणायचे आणखी लग्नाचा काही प्लान वगैरे नाहीये. ठरल्यानंतर लगेच कळवू, असे दोघेही म्हणायचे. तुम्हाला रेवती आणि आदिश यांची जोडी आवडायची का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version