ऑनस्क्रीन भाऊ बहीण साकारणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात बनले पती पत्नी

अभिनय क्षेत्रातील कलाकारांचे जीवन त्यांच्या ऑनस्क्रीन लाइफ पेक्षा खूप वेगळे असते. म्हणजेच मालिकां आणि चित्रपटांमधले काही कलाकार जरी ऑनस्क्रीन बहीण भावाची नाते साकारताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यातील त्यांचंही नाते वेगळेच असते. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच कलाकारांच्या नात्याबद्दल ज्यांनी अभिनय क्षेत्रात भावा बहिणीचे नाते साकारले परंतु वास्तविक आयुष्यात ते एकमेकांचे पती पत्नी आहेत.

अशीच एक पहिली जोडी आहे अभिनेता आलोक राजवाडे आणि अभिनेत्री पर्ण पेठे यांची. आलोक आणि पर्ण हे दोघेही पुण्यातलेच. दोघेही एकाच नाटक कलामंच मध्ये काम करत होते.  आलोक आणि पूर्ण एकाच ‘नाटक कंपनी’ चे संस्थापक सदस्य होते. ‘आसक्त कलामंच’ या नाटक ग्रुपमध्ये दोघे काम करायचे. या कलामांच्यातील ‘झूम बराबर झूम’ या नाटकात त्यांनी काम केले होते. या नाटकात दोघे भाऊ बहीण होते. त्यानंतर ‘विहीर’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी भावा बहिणेचे नाते साकारले होते. शूटिंग दरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळपास सहा वर्षे दोघे रिलेशन मध्ये होते. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी कोणत्याही प्रकारचे विधी न करता आलोक-पर्ण यांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रीणींसमोर कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर कलर्स मराठीवरील ‘स्वामींनी’ या मालिकेत पर्ण आणि आलोकने रमाबाई आणि माधवरावांची भूमिका साकारली.  

झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ हि मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. सखी आणि सुव्रत ची पहिली भेट दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर झाली. सखीला सेटवर एन्जॉय करत काम करायला खूप आवडायचं पण सुव्रत अतिशय सिरियस मुलगा आहे आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर दोघांची घट्ट मैत्री झाली.  नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या मालिकेत सखीने रेश्मा पाटील हि भूमिका साकारली होती तर सुव्रतने सुजय हि भूमिका साकारली होती. या मालिकेत दोघांनी मानलेल्या भावा बहिणीचे नाते साकारले होते. ११ एप्रिल २०१९ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले.     

तर मित्रांनो यातील तुमची आवडती जोडी कोणती ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags : Reel life Brother sister become real life partner

Leave a Comment

Exit mobile version