‘रात्रीस खेळ चाले ३’ १६ ऑगस्ट पासुन होणार सुरू

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका कधी सुरू होणार असा प्रश्न प्रेक्षकांमद्धे होता. मालिकेचे तिसऱ्या पर्वातील काही भाग प्रदर्शित देखील झालेले आणि त्या भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या मालिकेचे शुटींग सिधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होते . आणि करोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे सगळ्याच मालिकेंच शुटींग थांबवण्यात आलेले. बाकी मालिकेंचे शुटींग हे परराज्यात सुरू करण्यात आले , परंतु ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे शुटींग परराज्यात हलवणे शक्यच नव्हते ,त्याच कारण म्हणजे अण्णा नाईक यांचा दाखवण्यात आलेला वाडा .

त्यामुळे ही मालिका आता दाखवणार की नाही असा प्रश्न सगळ्यांमद्धे होता. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सगळ्या मालिकेंचे शुटींग पुन्हा महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर देखील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे शुटींग मात्र सुरू झाले नव्हते. पण काही दिवसांपूर्वी या मालिकेच शुटींग सुरू करण्यात आलेले आहे ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना मिळाली आणि सगळेच खुश झाले.

आणि झी मराठी वाहिनीवर देखील आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ १६ ऑगस्ट पासुन सुरू होणार असल्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग खुपच खुश आहे.

तर तुम्ही ‘रात्रीस खेळ चाले ३’ पुन्हा पाहायला उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version