अभिनेत्री कुंजीका काळविंट दिसणार ‘ती परत आलीये’ या मालिकेत

झी मराठी वाहिनीवर येत्या १६ ऑगस्ट पासुन ‘देवमाणूस’ या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता नवी मालिका प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. ‘ती परत आलीये’ असं त्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरवातीला आपण अभिनेता विजय कदम यांना पहिले होते , मात्र इतर कलाकारांबद्दल काहीही खुलासा झाला नव्हता . आणि आता या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून कोण झळकणार हे नुकतेच समोर आले आहे.

‘ती परत आलीये’ या मालिकेत विजय कदम यांच्यासह अभिनेत्री कुंजीका काळविंट हिचे नाव समोर आले आहे. याआधी अभिनेत्री कुंजीकाने ‘एक निर्णय’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तसेच कुंजीकाने कलर्स मराठी वरील ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती. आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने सुबोध भावे यांच्यासोबत काम केले होते. यात तिने प्रियाची भूमिका साकारली होती. आणि आता ‘ती परत आलीये’ या मालिकेत ती मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

या मालिकेत अभिनेत्री कुंजीका सोबत अभिनेता श्रेयश राजे दिसणार आहे. श्रेयसने याआधी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत राजकुमारची भूमिका साकारली होती. तसेच सोनी मराठी वरील भेटी लागी जिवा’ आणि जिगरबाज या मालिकेंमध्ये देखील त्याने काम केले होते .

‘ती परत आलीये’ ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version