रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेता आशुतोष गोखले याने करोनावर केली यशस्वीरीत्या मात

अभिनेता आशुतोष गोखले हा ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहचला. स्टार प्रवाहवाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदारची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह होता. आशुतोष याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता.  त्यामुळे आशुतोष मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता.     

आशुतोष याने कोरानावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आशुतोष आता कोरोनातून पूर्ण पाने बरा झाला असून त्याचा १४ दिवसांचा क्वारंटाइन पिरियड संपला आहे. लवकरच तो मालिकेमध्ये अभिनय साकारताना दिसणार आहेत.  आशुतोषला अभिनयाव्यतिरिक्त समाजसेवेची आवड आहे. तो ‘खाना चाहिये’ या संस्थेसोबत तो कार्यरत आहे. कोरोना लॉकडाऊन काळात आशुतोष दररोज मुंबईतील गरीब आणि गरजू लोकांपर्यंत फूड पॅकेट्स वाटप करायचा. 

Tags: Aashutosh Gokhale recovered from corona, Rang maza vegala fame ashutosh gokhale corona positive

Leave a Comment

Exit mobile version