बिग बॉस मराठी सीजन १ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शर्मिष्ठाने याआधी तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती. २१ जून २०२० रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा पार पडला होता. शर्मिष्ठाचा होणार नवरा तेजस देसाई हा बोस कंपनीमध्ये रेजिनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने तिच्या सोसिअल मेडिया अकॉउंटवरून तिच्या लग्नाची बातमी दिली आहे. तिचा विवाह सोहळा ११ ऑक्टोबर २०२० रोजी पार पडणार आहे.
शर्मिष्ठा लवकरच तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. तिने बिग बॉस मध्ये असताना आपण पहिल्या लग्नातून विभक्त झाल्याचे स्पष्ट केले होते. पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्याचे तिने सांगितले होते. शर्मिष्ठाचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्या सोबत झाल होतं. परंतु त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.
शर्मिष्ठाने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अभिलाषा’, ‘एक झुंज वादळाशी’, ‘उंच माझा झोका’, ‘कुंपण’, ‘सप्तपदी’, ‘जुळून येती रेशीम गाठी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. ‘दे धक्का’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘ची व ची सौ कां’, ‘काकस्पर्श’, ‘रंगकर्मी’, ‘योद्धा’ यांसारख्या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.
तर मित्रांनो अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची जोडी तुम्हाला आवडली असेल तर कमेन्ट करून नक्की सांगा.
Tags: Sharmishtha Raut Marriage, Sharmishtha Raut Wedding, Sharmishtha Raut Marriage Date, Sharmishtha Raut Husband