Orry in Ambanis Wedding : ओरी अंबानीच्या लग्नात! हा ओरी आहे तरी कोण?

आजकाल फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जेव्हा पार्टी असते तेव्हा मोठ्या स्टार्स आणि स्टारकिड्स असलेल्या व्यक्तीचे फोटो खूप व्हायरल होतात. केवळ पार्ट्या आणि इव्हेंट्सच नाही तर फिल्म स्टार्सही या व्यक्तीसोबत फोटो शेअर करताना दिसतात. ओरी असे या व्यक्तीचे नाव आहे. ओरीचे अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबतचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडतो की, हा ओरी आहे तरी कोण? जो सर्व सेलिब्रिटी चा आवडीचा आहे.

ओरी ने नुकतच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या अनंत अंबानी च्या लग्नात हजेरी लावली. ओरी ने हॉलिवुड ची सुप्रसिद्ध गायिका रिहाना बरोबरचा फोटो इन्स्टाग्राम वर शेयर केला आणि पुन्हा एकदा ओरी सोशल मीडिया वर वायरल झाला.

ओरीची फिल्म स्टार्ससोबतची छायाचित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नीसा देवगणपासून सुहाना खान, जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडेपर्यंत, ओरीचे फोटो प्रत्येक स्टारकिडसोबत पाहायला मिळतील. त्याचे पूर्ण नाव ओरहान अवतारमणी असे आहे. तो फिल्म इंडस्ट्रीचा भाग नाही, पण इंडस्ट्रीतील लोकांशी त्याची चांगली मैत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे.

फिल्म स्टार्स ओरीसोबत फक्त फोटोच क्लिक करत नाहीत तर ओरीचे खुलेपणाने कौतुकही करतात. अनन्या पांडेने ओरीची स्तुती करताना म्हटले आहे की, ‘तो प्रत्येक पोस्टमध्ये उत्तम कॅप्शन लिहितो आणि मी त्याला कॅप्शनसाठी मदतही विचारते. तो काय करतो हे मला माहीत नाही, पण तो स्वतःवर काम करतो. दरम्यान, सारा म्हणाली, ‘ओरी खूप प्रतिभावान आहे आणि त्याची विनोदबुद्धी देखील चांगली आहे. तो खूप आनंदी व्यक्ती आहे आणि अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे.

ओरी काय करतो?

ओरीचे अंबानी कुटुंबाशी घट्ट नाते आहे. नीता अंबानी आणि ईशा अंबानीसोबतचे त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. इतकेच नाही तर ओरीची अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिकासोबतही चांगली मैत्री आहे. तिच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमालाही तो उपस्थित होता. ओरीबद्दल हे एक गूढच राहिले की तो आपला खर्च भागवण्यासाठी काय करतो?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओरी अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो येथे राहत होता. त्याला ग्राफिक डिझाइनमध्येही रस आहे. याशिवाय ओरी हा सोशल मीडिया ॲक्टिविस्ट आणि ट्रेंड ॲनिमेटर आहे.

Leave a Comment

Exit mobile version