अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर अगबाई सासूबाई मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांची एंट्री

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सासुबाई’ ह्या मालिकेत आता एक फेमस मराठी कलाकाराची एन्ट्री होणार आहे. नुकताच झी मराठीने त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमो देखील रिलीज केला आहे.

मंडळी, फक्त आवाजावरूनच तुम्ही ह्या अभिनेत्याला ओळखले असेल कारण हे मराठीमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच नाव आहे मोहन जोशी. मोहन जोशी हे अग्गबाई सासुबाई मालिकेत सोहमचे आजोबा दत्तात्रय बांडोपंत कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहे. सोहमच्या आजोबांची ही भूमिका अगोदर ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन हे साकारत होते पण त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे म्हणून ही भूमिका आता मोहन जोशी साकारणार आहेत.

अभिनेते मोहन जोशी यांना आपण अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलं आहेच तसेच मराठी मालिकांमध्ये देखील त्यांनी कामं केली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेत देखील त्यांना आत्ता आपण पाहत आहोत.

Tags: Mohan Joshi entry in Aggabai Sasubai Serial

Leave a Comment

Exit mobile version