ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिनय सोडून करते शेती

अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी हिने आनंदाचे शेत निर्माण केल आहे. संपदा आणि तिच्या पतीने शेती आणि ग्रामीण भाग ही मध्यवर्ती संकल्पना राबत कृषी पर्यटनाचा नवा पॅटर्न त्यांनी शोधून काढला आहे. रत्नागिरीमधील फुणगूसमधील त्यांच्या या पॅटर्नचे नाव आहे आनंदाचे शेत. आंबा , काजू यांसारख्या फळांची लागवड त्यांनी केली . यांचा भाजीपाला आणि फळे थेट मुंबईमध्ये सुद्धा विक्रीसाठी जातात. या आनंदाच्या शेताची खासियत म्हणजे या डिजीटल युगात जेव्हा मुले या शेताला भेट देतात तेव्हा मोबाइलपासून दूर नेत त्यांना बैलगाडीची सफर घडवत सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात येत. आमराईत घर , घरातल्या भाज्या जेवणातल्या ताटात, चुलीवरचे जेवण, कुणालाही आपल्या गावची आठवण करून देईल अशा कोकणातल्या विविध भागातील पाककृती इथे जेवणात असतात. याशिवाय सगळ्या गोष्टींची माहिती मुलांना दिली जाते.

संपदा ही उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिका आहे. मात्र आता ती शेतात राबतेय. संपदाचे पती जाहिरात कंपनीत क्रिएटीव्ह हेड होते तर संपदाचे अभिनयातील करिअर शिखरावर होते . पण दोघांनी हे ‘आनंदाचे शेत’ बहरवण्याचा निर्णय घेतला. त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती अशात त्यांनी शेतीविषयक पुस्तके , गुगल तज्ज्ञ मंडळीच्या सहाय्याने शेतीचे ज्ञान घेतले. आणि नोकरीला रामराम ठोकून दोघांनी पूर्णपणे स्वत:ला शेतीत झोकून दिले.

तर तुम्हाला संपदाचा अभिनय सोडून आनंदाचे शेत बहरवण्याचा निर्णय कसा वाटला हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version