अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

 करोनाच्या या भयानक रोगामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनेता , बिग बॉस मराठी सीजन वन चा स्पर्धक भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांच २९ मे ला कोविडमुळे निधन झालय. काही दिवसांपूर्वी दोघांनाही करोनाची लागण झालेली .  भूषण हा बोरिवली मधल्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता तर कादंबरीची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ठाण्यातील एक हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले.

सध्या लॉककडाऊन मुळे शुटींग बंद आहेत म्हणून आर्थिक परिस्थिती बिकट होती. कादंबरीच्या औषधोपचारासाठी सोशल मीडिया वर मदतही मागण्यात आली होती. कादंबरी आणि भूषणला प्रतीर्थ नावाचा लहान मुलगा आहे. कादंबरी त्याला घेऊन बिग बॉस च्या घरात भूषणला भेटायला एक टास्क दरम्यान आली होती. कादंबरी एक गृहिणी होती तर तिचा एक व्यवसाय देखील होता.

 A to Z मराठी कडून कादंबरीला भावपूर्ण श्रद्धांजली .  

Leave a Comment

Exit mobile version