मराठी कलाकार या बिझनेस मधून लाखों रुपये कमावत आहेत.

प्रत्येक माणसाला आपण करत असलेल्या कामापेक्षा वेगळं काही तरी करायची इच्छा असते. त्यामुळे काहीजन एखादा नवीन छंद जोपासतात तर काहीजन व्यवसायाला सुरुवात करतात. मराठी कलाविश्वात असे काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय चालू करून त्यामध्ये यश मिळवले आहे. आज ते आपल्या व्यवसायातून लाखों रुपये कमावत आहेत. तर आज आपण असे मराठी कलाकार पाहणार आहोत ज्यांनी आपला स्वतःचा नवीन व्यवसाय चालू केला आणि त्यात त्यांना भरघोस यश देखील मिळालं आहे.

  • अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. या दोघींनी मिळून कपड्यांचा ब्रॅंड लॉंच केला आहे. त्यांच्या ब्रॅंडचे नाव तेजाज्ञा असे आहे. त्यांचा हा ब्रॅंड खूपच लोकप्रिय आहे. अभिज्ञा आणि तेजस्विनी या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनाही फॅशन डिजायनिंगची खूपच आवड आहे. या व्यवसायातून त्या लाखों रुपये कमावत आहेत.

  • शशांक केतकर.

अभिनेता शशांक केतकर याला आपल स्वतःच हॉटेल असावं अशी खूप इच्छा होती त्यामुळे त्याने पुण्यात स्वतःचे हॉटेल उघडले. त्याच्या हॉटेलचे नाव “आईच्या गावात” असे आहे. शशांकच्या या हॉटेल मध्ये खूपच गर्दी असते. शशांकला हॉटेल चालवण्यात त्याचे आई बाबा आणि बायको देखील मदत करत असतात. शशांकला पाहण्यासाठी त्याचे चाहते खास त्याच्या हॉटेल वर जातात आणि त्याच्यासोबत सेल्फी देखील घेतात. शशांक आत्ता कलर्स मराठी वरील हे मन बावरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

  • आरती वादगबाळकर

अभिनेत्री आरती वादगबाळकर हिचा देखील कंपड्यांचाच व्यवसाय आहे. आरती एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका, निर्माती आणि फॅशन डिजायनर देखील आहे. तिच्या कपड्याच्या ब्रॅंड साठी प्रसिद्ध अभिनेते अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ चांदेकर फोटोशूट देखील करत असतात. कपड्यांच्या या व्यवसायातून ती लाखों रुपये कामावते.

  • क्रांती रेडकर

अभिनेत्री क्रांती रेडकर ही सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री. तिचे लग्न झाल्यापासून ती आपल्याला अभिनयापासून दूरच दिसली. आता तिला २ जुळ्या लहान मुली देखील आहेत, त्यामुळे तिला तिच्या मुलींकडे देखील लक्ष द्यावे लागते. परंतु अभिनेत्री क्रांती रेडकर हिचा देखील कपड्यांचा व्यवसाय आहे. ती देखील या व्यवसायातून लाखों रुपये कामावते. आत्ता तिने नुकताच ज्वेलरीचा नवीन ब्रॅंड देखील लॉंच केला आहे.

  • पराग कान्हेरे

अभिनेता आणि बिग बॉस मराठी फेम पराग कान्हेरे हा एक प्रसिद्ध शेफ आहे. परागने नुकताच एक हॉटेल चालू केल असून त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे वडापाव बनवले जातात. त्याच्या या वडापावची चव चाखायला लोक खूप लांबवरून येतात. पराग ची पत्नी देखील त्याच्या या कामात त्याला खूप मदत करत असते.

  • अपूर्वा नेमळेकर

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताचा अंदाज प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर एक ज्वेलरी डिजायनर आहे. तिचा ज्वेलरीचा स्वतःचा एक ब्रॅंड देखील आहे. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर तिच्या या ब्रॅंडला नेहमी प्रोमोट करत असते.

  • निवेदिता सराफ

अग्ग्बाई सासूबाई फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा स्वतःचा एक साड्यांचा ब्रॅंड आहे. त्याच्या या ब्रॅंड चे नाव आहे “हंसगामिनी”. त्यांचा हा साड्यांचा ब्रॅंड खूपच प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून त्या लाखों रुपये कमावत आहेत. त्याशिवाय त्यांच यूट्यूब वर रेसेपीचे चॅनेल देखील आहे. त्या आपल्या विडियो च्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळ्या रेसेपी शिकवत असतात.

तर मित्रांनो यापैकी कोणाचा व्यवसाय तुम्हाला आवडला ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=K8b72VS34jM

Tags: Marathi Actors Side Business, Apurva Nemlekar Side Business, Nivedita Saraf Business, Abhidnya Bhave Business, Shashank Ketkar Business, Parag Kanhere Business, tejaswini pandit side business

Leave a Comment

Exit mobile version