अरुंधतीचा रीयल लाइफ नवरा पहा.

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून आपल्या समाजात घरकाम करणाऱ्या आईला आपण किती गृहीत धरतो हे दाखवण्यात आलं आहे. आई नेहमी घरातील सर्वांचा विचार करत असते पण आपण तिच्या कामाचं कौतुक करणं सोडून द्या पण साधी तिची विचारपूस देखील करत नाही. तिला काय आवडतं, तिला काय वाटतं हे आपल्याला ती कधीच कळू देत नाही. याउलट ती तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय आवडतं याचाच नेहमी विचार करून सर्व काम वेळेत करून देते. आईवर आधारित असणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतही असंच काहीस आपल्याला पाहायला मिळतं तर आज आपण या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधती ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

मधुराणी यांचा जन्म महाराष्ट्रातील भुसावळ येथे झाला असून त्या लहानाच्या मोठ्या पुण्यात झाल्या. त्यांचं संपूर्ण बालपण देखील पुण्यातच गेलं. मधुराणी यांचं शालेय शिक्षण पुण्यातील HHCP Highschool मधून पूर्ण झाले असून महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या SP College मधून पूर्ण झाले आहे. मधुराणी याना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. फक्त १६ वर्षांच्या असतानाच त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पुरुषोत्तम करंडक साठी त्यांनी स्वतः बसवलेल्या नाटकाला पारितोषिक देखील मिळालं होतं. त्यांनी पुणे विद्यापीठातून Mass Communication चा कोर्स देखील पूर्ण केला आहे.

अभिनेत्री मधुराणी यांनी झी मराठी वाहिनीवरील इंद्रधनुष्य या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर पुन्हा एकदा असंभव या मालिकेच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. सुंदर माझं घर, गोड गुपित, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र यांसारख्या मराठी चित्रपटात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

मधुराणी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ रोजी झालं. त्यांना एक लहान मुलगी देखील आहे. मधुराणी ह्या अभिनेत्री, कवयित्री, गायिका आणि संगीतकार देखील आहेत  मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर यांनी फिल्म मेकिंग शिकवण्यासाठी एक कोर्से देखील सुरु केला आहे. प्रमोद प्रभुलकर यांनी YouthTube या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आत्ता स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत आईची प्रमुख भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांच्या हि मालिका खूपच पसंतीस उतरत आहे. तर मित्रानो या मालिकेतील अरुंधतीचं पात्र तुम्हाला कसं वाटतं ते आम्हाला कंमेंट करून सांगा.

Title: Madhurani Prabhulkar Wiki, Biography, Birthdate, Age, Husband, Kids, Family, Movies, Serials, Qualification

Tags: Madhurani Prabhulkar, Madhurani Prabhulkar Wikipedia, Madhurani Prabhulkar Husband, Madhurani Prabhulkar inforamation, madhurani gokhale prabhulkar, madhurani gokhale prabhulkar husband, madhurani gokhale prabhulkar kids, madhurani gokhale prabhulkar daughter

Leave a Comment

Exit mobile version