मुलगी झाली हो मालिकेतील दिव्या बद्दल बरंच काही

मुलगी झाली हो या मालिकेतील छोटी माऊ प्रेक्षकांच्या खूप जवळची झाली होती. छोट्या माउच पात्र बाल कलाकार मैथिली पटवर्धन हिने साकारल होत. पण मालिकेत माऊ आता मोठी झाली आहे  त्यामुळे मोठी माऊ सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करतेय पण मोठी माऊ सकरणारी अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल म्हणूनच आज आपण मोठ्या माऊ बद्दल जाणून घेणार आहोत.

मुलगी झाली हो या मालिकेत मोठ्या माऊ ची भूमिका अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर साकारत आहे. दिव्या चा जन्म 26 जुलै 1996 मध्ये झाला आहे. दिव्या च मूळ गाव मानगाव आहे परंतु ती मुंबई मध्ये राहते. तीच शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई मध्येच पूर्ण झाल. दिव्याला अभिनयासोबतच मॉडेलिंग ची खूप आवड आहे. मी मराठी आयोजितने  केलेल्या मुंबई ची सुकन्या या फॅशन शो ची ती विजेती ठरली  आहे. दिव्या ने स्टार प्रवाह च्या प्रेम तुझा रंग कसा या मालिकेतून मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केल. या मालिकेत तिने छोटासा रोल केल होता. त्यानंतर स्टार प्रवाह च्या विठूमाऊली या मालिकेत चंद्र भागा ही भूमिका तिने साकारली होती.

आता दिव्या मुलगी झाली हो या मालिकेत माऊच्या प्रमुख भूमकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला दिव्याचा अभिनय कसा वाटतो ते कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version