अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने वर्तमानपत्रापासून बनवला ड्रेस

लॉकडाउन मुळे सर्व कलाकार आपापल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवत आहे तर कोणी शेतात काम करत आहे. लॉकडाउन मुळे सर्व मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग बंद आहे त्यामुळे सर्व कलाकारांना मोकळा वेळ मिळाला आहे. या मोकळ्या वेळात मराठी कलाकार काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.


त्यातच अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाड हिने देखील लॉक डाउन मध्ये घरी बसल्या बसल्या एक नवीन शक्कल लढवली आहे. तिने वर्तमानपत्रापासून एक ड्रेस बनवला आहे. कृतिकाने स्वतः वर्तमानपत्रापासून टॉप आणि स्कर्ट तयार केला आहे. नंतर तो ड्रेस परिधान करून फोटोशूट देखील केले आहे. तिने ते फोटो सोसिअल मीडिया वर पोस्ट करताना कॅप्शन दिले आहे कि “Quarantine मधील प्रयोग”. कृतिका गायकवाडचे हे फोटो सोसिअल मीडिया वर खूपच वायरल होत आहे.

Krutika Gaikwad Newspaper Dress

Tags: Krutika Gaikwad Newspaper Dress, Krutika Gaikwad Dress, Krutika Gaikwad Hot in news paper dress, krutika gaikwad dancer, krutika gaikwad new dress

Leave a Comment

Exit mobile version