कार्तिकी गायकवाड आणि रोनीत पिसे विवाह बंधनात अडकले.

सर्वांची लाडकी सुरांची राणी अशी एक गायिक म्हणजेच कार्तिकी गायकवाड. सा,रे,ग,म,प ची लिटिल चॅंप विजेती कार्तिकी गायकवाड हिचा काल विवाह सोहळा संपन्न झाला. रोनीत पिसे असे तिच्या पतीचे नाव रोनीत हा एक Mechanical Engineer आहे. मोजके नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाउनच्या काळात २६ जुलैला त्यांचा साखरपुडा पार पडला होता. ह्या दोघांचही अरेंज मॅरेज आहे आणि काल ह्या दोघांचा विवाह सोहळा पार पडला.

ह्या विवाह सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. प्राजक्ता गायकवाड, आर्या आंबेकर, राहुल देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी कार्तिकी ‘गजर कीर्तनाचा’ ह्या कार्यक्रमात निवेदिका म्हणून प्रेक्षकांनसमोर आली होती.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्या मालिकेच्या शीर्षक गीतामुळे ती खूप चर्चेत आली. अगदी दर्जेदार अस शीर्षक गीत तिने गायलं आहे. त्या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

Tags: Kartiki Gaikwad Marriage, Kartiki Gaikwad Wedding, Kartiki Gaikwad and Ronit Pise Marriage photo, Kartiki Gaikwad lagn

Leave a Comment

Exit mobile version