Jay Dudhane news : बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे ने मालिका सोडली कारण…

Jay Dudhane news : बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे ने मालिका सोडली कारण…स्टार प्रवाह वरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम, जय दुधाने आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेला चालू होऊन फक्त दोन महिने झाले आहेत, अशातच अभिनेता जय दुधाने याने येड लागलं प्रेमाचं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत अभिनेता जय दुधाने इन्स्पेक्टर जय घोरपडे ची भूमिका साकारत होता. जय दुधाने आणि विशाल निकम यांचे बिग बॉसच्या घरात अजिबात जमत नव्हते. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील खूपच उत्सुक होते.

Jay Dudhane

जयने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक स्टोरी शेअर करत मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. जयने स्टोरी मध्ये लिहिलं आहे की “मी एका महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना गमावलं. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे मी यापुढे स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत काम करू शकणार नाही. या संपूर्ण कास्ट आणि चैनल सोबत काम करण्याचा हा अनुभव खूपच चांगला होता. तुम्ही या मालिकेवर असंच प्रेम करत राहाल त्याची अपेक्षा बाळगतो. माझ्याकडून मालिकेला खूप खूप शुभेच्छा.”

आणखी वाचा :

Lakhat Ek Aamcha Dada Twist : ‘लाखात एक आमचा दादा’ तुळजाने मोडल लग्न

Sangram Salavi Entry: देवयानी च्या संग्राम ची या मालिकेत जबरदस्त एंट्री!

Tharal Tar Mag New Promo: सायली प्रतिमा जिवंत आहे हे सिद्ध करणार, अर्जुन सायलीला बजावणार

जय दुधाने याच्या वडिलांचं जून महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तो अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. जयला बिग बॉस मराठी 3 मुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. जय दुधाने याने मालिका सोडल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेता संग्राम साळवी आपल्याला इन्स्पेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेता संग्राम साळवी याने स्टार प्रवाह वरील देवयानी या सुप्रसिद्ध मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता तो येड लागलं प्रेमाचं या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार आहे. तर मित्रांनो जय दुधाने याच्या जागी अभिनेता संग्राम साळवी याला इन्स्पेक्टर जय घोरपडे च्या भूमिकेत पहायला तुम्हाला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version