ससुराल सिमर का फेम सिमर आणि प्रेम लग्नाच्या 5 वर्षांनंतर झाले आई बाबा!

ससुराल सिमर का या मालिकेतून घराघरांत पोहचलेली सिमर म्हणजेच अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ससुराल सिमर का, कहा हम कहा तुम या मालिकांमध्ये काम केले आहे. ती ससुराल सिमर का नंतर हिंदी बिग बॉस सीजन १२ मध्ये झळकली होती. या सीजनची ट्रॉफी तिने आपल्या नावी केली होती. तिने तिचा कोस्टार शोएब इब्राहिम सोबत २०१८ मध्ये लग्न केले होते. दोघेही टेलीविजनचे परफेक्ट आणि क्यूट कपल आहेत.


दीपिका आणि शोएब आई बाबा झाले आहेत. लग्नाच्या ५ वर्षांनंतर ते आई बाबा झालेत. २१ जूनला दीपिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्या घरी एका लहान बाळाचे आगमन झाले आहे. याची माहिती शोएब ने सोशल मीडिया द्वारे कळवली आहे. इब्राहिम आणि कक्कर फॅमिली मध्ये सध्या खूप आनंदाचे वातावरण आहे.


दीपिका प्रेग्नन्सी मध्ये काम करत नव्हती. तिने तिची प्रेग्नन्सी खूप एन्जॉय केली. सध्या शोएब हा स्टार भारत वरील शो अजुनी या मालिकेमध्ये काम करत आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका, शोएब आणि बाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे चाहते आणि बऱ्याच कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Exit mobile version