देवमाणूस मालिकेतील डिंपी बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या सत्य घटनेवर आधारित मालिकेच्या माध्यमातून आपल्याला अभिनेता किरण गायकवाड साकारत असलेल्या डॉक्टरची कथा आपल्याला समजत आहे. हा डॉक्टर त्याच्या मार्गात येणाऱ्या माणसांचा जीव घेताना आपल्याला दिसतो. या मालिकेतील डिंपीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. डिंपी हे पात्र अभिनेत्री अस्मिता देशमुख साकारत आहे. तर आज आपण अभिनेत्री अस्मिता देशमुख विषयी जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अस्मिता देशमुख हिचा जन्म 29 जून रोजी पुण्यामध्ये झाला आहे. ती लहाणाची मोठी देखील पुण्यातच झाली. अस्मिताच्या वडिलांचे नाव शरद देशमुख असे आहे. अस्मिताने आपले शालेय शिक्षण पुण्यातील हुजूर पागा गर्ल्स हाय स्कूल मधून पूर्ण केले असून पुण्यातील SNDT कॉलेज मधून B.SC मध्ये पदवी प्राप्त केली आहे. अस्मिताला अभिनयाची आवड असल्यामुळे या पूर्वी तिने काही म्युझिक एल्बम आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका आहे. या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेतील डिंपी हे पात्र ती साकारत आहे. आत्ता या मालिकेत पुढे काय काय होणार ते पाहण औत्सुकयाचे ठरेल. तर मित्रांनो अस्मिताने साकारलेल डिंपी हे पात्र तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेन्ट करून सांगा.

Tags: Asmeeta Deshmukh Biography, Devmanus fame asmeeta deshmukh, dimpi real name in devmanus

Leave a Comment

Exit mobile version