दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचा वाद अखेर संपुष्टात आला.

स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ह्या मालिकेचा जो वाद होता तो अखेर संपुष्टात आला आहे. ‘’ज्योतिबाचा जो इतिहास आहे तो कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही’’ असं महेश कोठारेंनी गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी आणि भाविकांनी काही आक्षेप नोंदवला होता. गावकऱ्यांची अशी इच्छा होती की मालिका ही पुरातन व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी. यासाठी गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांची भेट घेऊन याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. राजगड येथे १८ नोव्हेंबेर रोजी यासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजुन घेत त्यांना असं आश्वासन दिल की ‘’ज्योतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे  काही वाहिनीवर दाखवले जाईल त्यातही काही चुकीच चित्रीकरण नसेल”

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी महेश कोठारे आणि गावकरी यांच्यात मध्यस्थीची भूमिका पार पाडली आणि गावकऱ्यांनी देखील समजूतदारपणा दाखवून गावाकडून मालिकेच्या चित्रीकरणाला कोणताही विरोध होणार नाही असा शब्द महेश कोठारे यांना दिला. यावेळी गावकरी, महेश कोठारे आणि स्टार प्रवाह वाहिनीचे सतीश राजवाडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे आभार मानले. यावेळी गावचे ग्रामस्थ देखील तिथे हजर होते.

tags: dakhkhancha raja jyotiba serial

Leave a Comment

Exit mobile version