अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने केला धक्कादायक खुलासा

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. याचसंदर्भात अभिनेत्री अश्विनी महांगडेने काही खुलासा केला आहे. तिने याचसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट च्या माध्यमातून तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना प्रश्न विचारला आहे. तीने या पोस्ट मध्ये म्हंटल आहे, या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आपले आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे साहेब यांना आहे विचारायचा आहे की ज्य खासगी हॉस्पिटल ला तुम्ही करोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यूदर वाढतोय हे गृहितच धरता का ? मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारचं .

पेशंटवर कधी व कोणते उपचार सुरू आहेत याची माहिती घरच्यांनी जाणून घेणे हा गुन्हा आहे का? असेच चालत राहिले तर यांना कोणीच जाब विचारणारे राहणार नाहीत . बाकी कागदोपत्री यांना पोसणारे सरकारी यंत्रणेतील मंडळी आहेतच . यात शेवटी गोरगरीब व तोंड गप्प ठेवणाराचं भरडला जाणार.

 पुढची लिस्ट लवकरचं संबधित अधिकारी वर्गाकडे पाठवेन पण त्यांनीही जनतेचा विचार करून कारवाई केली तरचं बरं नाहीतर आहेचं येरे माझ्या मागल्या .  

 तर अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या या पोस्ट वर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version