अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि रुचिका पाटील विवाह बंधनात अडकले

अभिनेता आशुतोष कुलकर्णी ८ जानेवारी रोजी मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकला आहे. रुचिका पाटील सोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. आशुतोष आणि रुचिका यांच्या लग्नात काही मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तीचा पती दुर्वेश देशमुख तसेच अभिनेत्री सायली देवधर यांनी देखील हजेरी लावली होती. आशुतोष आणि रुचिका यांचा पुण्यात ८ जानेवारी २०२१ रोजी विवाह सोहळा पार पडला.

अभिनेता आशुतोष कुलकर्णी लेक माझी लाडकी, साथ दे तू मला यांसारख्या प्रसिद्ध मालिकेत झळकला होता. तसेच त्याची पत्नी रुचिका पाटील देखील मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. आशुतोष कुलकर्णी आणि रुचिका पाटील यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Ashutosh Kulkarni Marriage, Ahutosh Kulkarni Wedding, Ashutosh Kulkarni and Ruchika Patil wedding, Ashutosh Kulkarni and Ruchika Patil Marriage, Ashutosh Kulkarni lagn

Leave a Comment

Exit mobile version