बाळूमामांच्या मालिकेतील सुंदराबाईंचा रीयल लाइफ मयप्पा पहा

कलर्स मराठी वाहिनीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभल या मालिकेमुळे बाळू मामांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळू मामाची तर अभिनेत्री कोमल मोरे बाळू मामांची पत्नी सत्यवा ची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय या मालिकेतील सुंदरा बाईंचे पात्र देखील तितकेच महत्वाचे आहे. सुंदरा बाई म्हणजेच बाळू मामांच्या आईची भूमिका अभिनेत्री अंकिता पणवेलकर साकारत आहे. तर आज आपण अंकिताच्या रीयल लाइफ मधील मयप्पा बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अंकिता पणवेलकर हिचे रीयल लाइफ मध्ये ओंकार पणवेलकर यांच्या सोबत लग्न झाले आहे. ओंकार देखील मराठी कलाविश्वाशीच निगडीत काम करत आहे. ते एका प्रॉडक्शन हाऊस मध्ये काम करत आहेत. अंकिता आणि ओंकार यांना एक लहान मुलगी देखील आहे. अंकिता नेहमी आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलीसोबतचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर करत असते.

अंकिताने यापूर्वी अनेक छोट्या मोठ्या मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे, परंतु बाळू मामाच्या नावानं चांगभल या मालिकेने सुंदरा बाईंच्या रूपात अंकिताला खरी ओळख मिळवून दिली. तर मित्रांनो अंकिता पणवेलकर हिची रीयल लाइफ मधील फॅमिली तुम्हाला आवडली का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.  

Tags: Ankita Panvelkar Husband Name, Ankita Panvelkar Family, Ankita Panvelkar Kids, Balumamachya Navan Changbhal Ankita Panvelkar

Leave a Comment

Exit mobile version