Ankita Bhagat got engaged with Gaurav Khankar

लॉकडाउन मध्येच खूप सारे प्रसिद्ध कलाकार विवाहबंधनात अडकले. अगदी सोप्या पद्धतीने सगळ काही करून आणि शासनाचे नियम पाळून कलाकारांनी लग्न उरकून घेतल. अशातच आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा साखरपुडा संपन्न झाला आहे. मराठी अभिनेत्री अंकिता भगत हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर साखर पुढ्याचे काही फोटो शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

अंकिताची एंगेजमेंट 10 ऑगस्ट रोजी झाली होती. मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. आत्ता तिने आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो आणि विडियो पोस्ट केले आहेत. साखरपुड्याचे फोटो पाहून मराठी कलाकार आणि तिचे चाहते तिच्यावर कमेन्टद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अंकिता भगतचा साखरपुढा गौरव खानकर याच्या सोबत झाला असून ते लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. अंकिताने विठू माऊली या मालिकेत जानकी देवीची भूमिका साकारली होती. त्या शिवाय अंकिता युवा डांसिंग क्वीन या शोमध्ये टॉप 6 फिनालिस्ट मध्ये देखील होती. अंकिता भगत आणि गौरव खानकर यांच्या भावी आयुष्यासाठी AtoZ मराठी टीम कडून खूप खूप शुभेच्छा.

Tags: Ankita Bhagat Engagement, Ankita Bhagat Sakharpuda, Ankita Bhagat Husband

Leave a Comment

Exit mobile version