‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकीने दिली आनंदाची गोड बातमी

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने चाहत्यांसोबत ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीनाक्षीने तिचा आणि तिचा पती अभिनेता कैलास वाघमारे दोघांचा डोहाळजेवणाचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या फोटोवर कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावच केला आहे.

मीनाक्षी स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडते. तसेच ती इनस्टाग्रामवर रील बनवत देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. ती आणि तिचे पती कैलास वाघमारे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

atozmarathi कडून मीनाक्षी आणि कैलासचे खुप खुप अभिनंदन .

Leave a Comment

Exit mobile version