अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसणार या नवीन मालिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील एका नवीन प्रोमोने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतल आहे. ही मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का?’ ह्या मालिकेत अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकर मुख्य भुमिकेत आहे आणि त्या सोबतच एक नवीन चेहरा पहिल्या प्रोमो मध्ये दिसला तो म्हणजे अभिनेत्री सानिया चौधरीचा पण दुसऱ्या प्रोमोमद्धे आपण जिला पहिल ती म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे. वैभवी असं तिच्या व्यक्तिरेखेच नाव आहे.

वैभवीच्या ह्या लुकसाठी शिवानीने केलाला मेकओवर सध्या चर्चेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमाबाई आंबेडकरच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केल. शिवानी  रमाबाईंची भूमिका खऱ्या अर्थाने जगली. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी तिने मेकओवर करण्याच ठरवलं.

लवस्टोरी आणि हॉरर या दोन्हीचा मेळ असणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेविषयी बोलताना शिवानी म्हणाली, “रमाबाईंची भूमिका खूप वेगळी होती मालिकेची सांगता झाल्यानंतर सांग तू आहेस का मध्ये वैभवीच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी लुक बदलला. लुक बदलल्यानंतर ती व्यक्तिरेखा सापडायला मदत होते असं मला वाटतं. वैदेही ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. प्रोमोमध्ये दिसणारा थ्रीलरचा फील प्रत्तेक एपिसोड मध्ये जपला जाणार आहे. विशेष म्हणजे ही एक रोमॅंटिक स्टोरी सुद्धा आहे. त्यामुळे मला काम करताना खूप छान वाटत आहे.”

तर मित्रांनो अभिनेत्री शिवानी रांगोळे हिला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Title: Shivani Rangole as vaibhavi in new serial sang tu ahes ka

Leave a Comment

Exit mobile version