सईच्या लग्नातील देवकार्याचे काही खास फोटो

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर लवकर लग्नगाठ बांधणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. २७ नोव्हेंबरला देवकार्य होते आणि ते उत्तमरित्या पार पडले. त्याचे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. देवकार्यासाठी सईने जांभळ्या रंगाची खनाची साडी नेसली होती. खनाची साडी, मोत्याचे दागिने, चंद्रकोर अश्या पारंपरिक वेशभुषेत सईचे सौदर्य खुलून दिसत आहे. सईचा होणारा पती तीर्थदीप रॉय याने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

तीर्थदीप व आई बाबांसोबतचे काही फोटो सईने सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत. २८ नोव्हेंबरला  सईचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर २९ नोव्हेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून, सई व तीर्थदीपने पाहुण्यांना लाल रंगाचा ड्रेस कोड पाळण्याचं सांगितले आहे. याच दिवशी सीमंत पूजन देखील पार पडणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार सई-तीर्थदीपचा विवाहसोहळा पार पडणार आहे आणि रिसेपशन सुद्धा ३० नोव्हेंबर रोजीच आयोजित केलं आहे.     

Title: Sai Lokur Devkarya Photo

Leave a Comment

Exit mobile version