अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल बरंच काही

अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली आहे . यातील मल्हार आणि अंतराची जोडी, त्यांची भांडण देखील प्रेक्षकांना आवडत आहे. अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण या दोन नविन चेहऱ्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतायत .

 तर आज आपण जाणून घेणार आहोत अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल

अभिनेत्री योगिता चव्हाण हिचा जन्म २७ मार्च १९९४ रोजी मुंबई मध्ये झाला . तिचं शालेय शिक्षण S.B.M पडवळ विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे मधुन पुर्ण झालय तर तिने तिचं B.Com च शिक्षण SK सोमईया कॉलेज मधुन पुर्ण केलय. योगिताने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंग केलय त्याचसोबत २०१६ मध्ये श्रावण क्वीनचे विजेतेपद देखील तिने पटकवले होते.

जाडू बाई जोरात, बापमाणुस, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर ‘भाकरवाडी’ सारख्या हिंदी मालिकेत देखील तिने काम केलय. २०१८ मध्ये तिने गावठी या चित्रपटात गौरी हे मुख्य भूमिका असलेले पात्र साकारले होते. आणि आता आपण अभिनेत्री योगिता चव्हाणला अंतराची भूमिका साकारताना पाहत आहोत.

 तर तुम्हांला अंतराची भूमिका कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .  

योगिता चव्हाण फोटो

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *