येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व कींजवडेकर याची रीयल लाइफ गर्लफ्रेंड दिसते खूपच सुंदर

झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व कींजवडेकर सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. शाल्व जसा ऑनस्क्रीन रोमॅंटिक आहे तसंच ऑफ स्क्रीन देखील तो खूपच रोमॅंटिक आहे. नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया वर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फोटो पोस्ट केला आहे.

शाल्वच्या गर्लफ्रेंड चे नाव आहे श्रेया डफलापूरकर. त्यांच्या रिलेशनशिपला १६ फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याचंच निमित्त साधत त्याने आपल्या गर्लफ्रेंड सोबत फोटो पोस्ट करत Caption दिले आहे की “Two years of madness and love, happy anniversary my little dove..” या फोटोमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत.

शाल्व आणि श्रेया मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत. ते दोघेही नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडिया वर शेयर करत असतात. श्रेया एक स्टायलिस्ट आहे.

शाल्व येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओंकारची प्रमुख भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री अनवीता फलटणकर स्वीटूची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री अनवीता फलटणकर हिने देखील त्यांच्या फोटोखाली एक सुंदर कमेन्ट केली आहे. तर मित्रांनो शाल्व आणि श्रेया यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Yeu kashi tashi me nandayala fame Shalva Kinjawadekar real life girlfriend

Leave a Comment

Exit mobile version