विद्या बालन ते करिश्मा तन्ना पर्यंत अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी सर्वोत्कृष्ट पत्रकारितेच्या पात्रांना जिवंत केलं.

पत्रकारितेच्या जगात उत्तम पत्रकार बनण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अश्या अनेक प्रतिभावान कलाकारांनी त्यांच्या चित्तथरारक चतुराईने पत्रकाराच्या भूमिका उत्तम रित्या साकारल्या.

” स्कूप” मध्ये करिश्मा तन्ना :
“स्कूप” या उत्कृष्ट वेब सिरीजमध्ये एक जिद्दी पत्रकार जागृती पाठकच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली. अभिनेत्री करिश्मा तन्ना ने जागृती ची भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

” धमाका” मधला कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन ने धमाका मध्ये एका पत्रकाराची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची मन जिंकली. सगळ्यांना एका रोलरकोस्टर राईडवर त्याचा हा अभिनय घेऊन जातो. अर्जुन पाठक एक वृत्त अँकर बनलेल्या कार्तिक ने दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

“नो वन किल्ड जेसिका” मधील राणी मुखर्जी

“नो वन किल्ड जेसिका” या आकर्षक चित्रपटात राणी मुखर्जी यांनी मीरा गायटी या शोध पत्रकाराच्या भूमिकेत पॉवरहाऊस परफॉर्मन्स दिला. राणी मुखर्जी यांची कामगिरी नक्कीच अतुलनीय होती.

” जलसा” मध्ये विद्या बालन
माया मेननच्या भूमिकेत विद्या बालनचा ‘जलसा’ मधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन तर जिंकली पण एक उत्तम पत्रकार म्हणून असलेला तिचा प्रवास हा नक्कीच अतुलनीय होता.

Leave a Comment

Exit mobile version