अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिला पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिच्या घरी ३ ऑगस्ट रोजी छोट्या पाहुण्याच आगमन झाल आहे. ही आनंदाची गोड बातमी तिने आज सगळ्यांनसोबत सोशल मीडिया द्वारे शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी चाहत्यांनसोबत शेअर करत ती म्हणाली , वडिलांवर, भावावर , सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर अति प्रेम असलं की, रंगभूमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन, हीरोची एंट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हीरोची एन्ट्री झालीये. असा प्रकारे तिने सगळ्यांनसोबत गोड बातमी शेअर केली आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा काही दिवसांपूर्वीच पुण्यातील ढेपे वाड्यामद्धे डोहळ जेवणाचा कार्यक्रम अगदी उत्तमरित्या साजरा झाला. याचा संपूर्ण व्हिडिओ तिने तिच्या यूट्यूब चॅनल वर शेअर केला आहे. उर्मीलाचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे ज्यावरून ती सगळ्यांना ब्युटी टिप्स आणि स्कीन care अशा बऱ्याच प्रकारचे टिप्स देत असते. तसेच तिने याआधी स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी’ या मालिकेत मैथिलीची मुख्य भूमिका साकारली होती.

A TO Z MARATHI कडूनअभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे खुप खुप अभिनंदन.

Leave a Comment

Exit mobile version