उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोनाची लागण..

मराठी इंडस्ट्री मधील सर्वांची आवडती, लाडकी जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या दोघांनीही नुकतेच सोशल मीडिया वर आपण करोना positive असल्याची बातमी शेअर केली आहे. प्रिया आणि उमेश यांचे  ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकासाठी विविध ठिकाणी दौरे चालू होते याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही . या दोघांसोबतच अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि आरती मोरे तसेच अभिनेता ऋषि मनोहर ही देखील या नाटकात काम करत होते.

उमेश आणि प्रिया यांनी इनस्टाग्राम स्टोरी शेअर करताना म्हणाले की, दुर्दैवाने आम्ही दोघेही करोना positive आलेलो आहोत. आम्ही स्वतःला होम quarantine केलेल आहे. आम्ही सर्व आवश्यक औषधे सावधगिरी घेत आहोत . कृपया गेल्या एक आठवडयात आमच्या  जे कोणी संपर्कात आलेलं आहे त्यांनी स्वतःची करोना टेस्ट करून घ्या किंवा स्वतःला वेगळे म्हणजेच quarantine करा.   

Leave a Comment

Exit mobile version