त्याच्या रक्तातच आहे ते… – दादूस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डब्बा गुल हे साप्ताहिक कार्य. या कार्यासाठी दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याचे प्लॅनिंग करणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करत आहेत आणि स्ट्रॅटजी आखताना दिसत आहेत .
 
मीराचे म्हणणे आहे, तिकडे (बॉक्स) आणल्या आणल्या सगळ्यांनी चालू करायचं गाठी मारायला. तर जय सांगत आहे, जेव्हा मी (बॉक्स) आणणार ना तेव्हा ते प्रोटेक्ट करण्यासाठी एक माणूस हवा तर दादूस देखील टीमला मदत करणार आहेत रस्सी बांधायला, गायत्री आहेच. कारण मला असं दिसतं आहे शंभर टक्के विकास येणारच. जरी त्याच्याकडे जास्त असतील ना (बॉक्स) तरी तो येणारच. दादूस म्हणाले त्याच्या रक्तातच आहे ते, काहीना काही करायला तो येतोच. उत्कर्ष म्हणाला शंभर टक्के रिबिन कापायला येतील.
 
बघूया आज काय घडणार साप्ताहिक कार्यात. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Comment

Exit mobile version