तुझेच मी गीत गात आहे……… या मालिकेत होणार राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीची एंट्री!

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका चांगल्या कथानकमुळे दिवसेंदिवस गाजतेय. ही मालिका trp मध्ये नेहमीच टॉप ५ मध्ये असते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हारला स्वराज हा आपलाच मुलगा आहे, हे कधी कळेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मंजुळाच्या एंट्रीने स्वराजला एक आई देखील मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया मराठेने हेल्थ इश्यू मुळे ही मालिका सोडली असून, तेजस्विनी लोणारी मोनिका नावाची भूमिका साकारतेय.

मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. शुभंकर ठाकूर असे पात्राचे नाव असून, मालिकेत एक नवे वळण येणार आहे. शुभंकर ठाकूर याचे मोनिकाशी खास नाते आहे. नाते काय आहे, हे पुढच्या एपिसोड मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभंकर ठाकूर ची भूमिका तुझ्यात जीव रंगला फेम राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी साकारणार आहे.

हार्दिकने यापूर्वी लक्ष्य, पुढचं पाऊल, आणि दुर्वा अशा स्टार प्रवाह वरील मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शुभंकर ठाकूर हा परदेशी राहत असून बिजनेसच्या कामामुळे तो भारतात आला आहे. शुभंकरच्या येण्याने मोनिकासोबत त्याचे काय खास नाते आहे हे मात्र नक्की कळेल.

तुम्हाला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत शुभंकर ठाकूरच्या भूमिकेत हार्दिक जोशीला पाहायला आवडेल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version