अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचे हटके फोटोशूट

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या स्टयलिश फोटोशूटमुळे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच धनश्रीने एका टी-शर्ट ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तिचे हे फोटो बरेच वायरल होत आहेत. याफोटोमध्ये धनश्री माडर्न आणि ग्लॅमरस लुक मध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. काही फॅन्सला तिचा हा लुक आवडला आहे तर काहींनी तिला हा लुक सूट होत नसल्याचे कंमेंट्स वरून दिसते.      

धनश्री ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सध्या ती भूमिका साकारत जरी नसली तरी यामालिकेतून प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हि एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबरच एक उत्त्तम डान्सर देखील आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ आणि ‘डाँसिन्ग queen’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. धनश्रीने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ‘जन्मगाठ’ या मालिकांमध्ये काम केले आहे.     

Tags: Dhanashri Kadgaonkar new photo

Leave a Comment

Exit mobile version