अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आला हा घाणेरडा अनुभव!

मराठी सिनेसृष्टीत तेजस्विनी पंडित ही एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तेजस्विनीने अनेक मराठी चित्रपटात त्याचबरोबर मालिकांमध्ये देखील काम केलंय. “रानबाजार” वेबसिरीजमुळे ती खूप चर्चेत राहिली. तेजस्विनीने खूप मोठा गौप्यस्फोट केलाय. यामध्ये तिने करिअरच्या सुरवातीला आलेला एक भयानक अनुभव शेअर केलाय. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने करिअरच्या सुरवातीच्या काळात आलेला एक अनुभव सांगितला. “मित्र म्हणे पॉडकास्ट” या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान तेजस्विनीने एक धक्कादायक सत्य बाहेर आणले. मुलाखती दरम्यान तेजस्विनी म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरवातीच्या काळात मी पुण्यातील सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. ते अपार्टमेंट एका नगरसेवकाच्या मालकीच होत. एकेदिवशी भाड देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने माझ्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची घाणेरडी मागणी केली.

त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर फेकला आणि म्हणाले की हेच करायचं असतं तर आज भाड्याच्या घरात राहिले नसते, स्वतःच घर असतं आणि दारात अनेक गाड्या उभ्या असत्या असं नगरसेवकाला सुनावलं” असा धक्कादायक खुलासा तेजस्विनीने केला. परंतू त्या नगरसेवकाच नाव मात्र तिने गुलदस्त्यातचं ठेवल. अशाप्रकारे तेजस्विनीने करिअरच्या सुरवातीचा हा धक्कादायक अनुभव मुलाखती दरम्यान सांगितला. 2004 साली केदार शिंदे दिग्दर्शित “अग बाई अरेच्चा” या चित्रपटातून तेजस्विनीने मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकलं.

Leave a Comment

Exit mobile version