तेजश्री प्रधान दिसणार स्टार प्रवाह वरील या नव्या कोऱ्या मालिकेत!

अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका विश्वात तसेच चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या मालिका आणि चित्रपट खुप गाजलेत. ती सर्वांची लाडकी आणि गुणवान अभिनेत्री आहे. तेजश्री स्टार प्रवाहच्या एका नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया द्वारे दिली आहे. मालिकेचे नाव, वेळ, दिनांक हे अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला आलेले नाही. पण तेजश्रीने म्हटल्याप्रमाणे प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेविषयी पूर्ण माहिती प्रोमो आल्यानंतर कळेल. तेजश्री सोबत अभिनेत्री शुभांगी गोखले या देखील नव्या मालिकेत झळकणार आहेत.

ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेने करियरची सुरुवात केलेल्या तेजश्रीने अवघ्या कमी वेळेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या होणार सून मी ह्या घरची, अग्गबाई सासूबाई या मालिका खूपच गाजल्या. ती सध्या काय करते, असेही एकदा व्हावे, हाजरी, अन्य या चिटपटांमधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच तिचा हॅशटॅग तदेव लग्नम हा चित्रपट येणार आहे.

तेजश्रीची नवी मालिका, नवी भूमिका या बद्दल प्रेक्षकांना खुप उत्सुकता आहे. चाहते तिच्या नव्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही तेजश्रीची नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version