अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या डान्स रील्सने 50 दशलक्ष व्ह्यूज आणि 150k व्ह्यूज चां ओलांडला टप्पा !

तमन्ना भाटियाने तिच्या प्रभावी अभिनय कौशल्याने आणि उल्लेखनीय नृत्य कौशल्याने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. जी करदा आणि लस्ट स्टोरी 2 च्या अलीकडच्या तिच्या प्रोजेक्ट्स च्या यशाने उंच भरारी घेतल्यानंतर तमन्ना जेलरच्या कावला या तमिळ गाण्यावर तिच्या डान्स मूव्ह्ससह पुन्हा चर्चेत येत आहे.जिथे ती ‘थलैवा’ रजनीकथसोबत खास डान्स करताना दिसतेय. गाण्यावरील डान्स रील्सने जगभरातील दर्शकांना मोहित करून ट्रेंडला सुरुवात केली आहे.

तमन्नाची व्यापक लोकप्रियता आणि तिच्या डान्स स्टेप्सने संपूर्ण देशाला थक्क करून सोडले आहे. 6 जुलै 2023 रोजी रिलीज झाल्यापासून, जानी मास्टरच्या आणि गायिका शिल्पा राव आणि गाण्याचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी गायलेल्या कावला या गाण्याच्या आकर्षक डान्स मूव्हज अनेक डान्स व्हिडिओंमध्ये व्हायरल झाल्या आहेत. तेव्हापासून, तिच्या डान्स मूव्हसह रीलला लाखो व्ह्यूज आणि अगणित शेअर्स मिळाले आहेत. आजपर्यंत, गाण्यावर असंख्य रील्स आले आहेत. मूळ व्हिडिओ ला 50 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ऑगस्ट २०२३ मध्ये तेलुगुमध्ये ‘मेगास्टार’ चिरंजीवीसोबत जेलर आणि भोला शंकर यांच्या रिलीजसाठी तमन्ना तयारी करत आहे. तिच्याकडे तमिळमध्ये अरनामनाई ४ हा प्रोजेक्ट् देखील आहे.


Leave a Comment

Exit mobile version