स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील या अभिनेत्याचे झाले निधन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल धनगरचे निधन झाले आहे. अवघ्या २८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने उज्वलने जगाचा निरोप घेतला. उज्वलच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत उज्वलच्या निधनाची बातमी दिली. गौरवने या पोस्ट खाली ‘उज्वल रघुनाथ धनगर .. भावपूर्ण श्रद्धांजलि . निवेदक उज्वलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असे लिहिले. अनेक कलाकारांनी कॉमेंट्सद्वारे उज्वलला श्रद्धांजलि वाहिली आहे.

उज्वलने ‘स्वराज्यरक्षक संभाजी,लक्ष्य , क्राइम पेट्रोल , यांसारख्या मालिकेंमध्ये काम केले होते. त्याचबरोबर उज्वलने अनेक कार्यक्रमांचे निवेदन देखील केले आहे.

 A to Z मराठी कडून उज्वल धनगर याला भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Comment

Exit mobile version