स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशीष कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आमचं ठरलंय म्हणत दोघांनी चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्याची जोरदार तयारी चालू होती. साखरपुड्याच्या मेहंदीची त्यांची तयारी जोरदार चालू होती. दोघांनी मेहंदीचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केले होते. मेहंदीचे सुंदर असे फोटो खूपच व्हायरल झाले होते. आशीष आणि स्वानंदी दोघेही मेहंदीच्या आउटफिट मध्ये खूपच सुंदर दिसत होते.

मेहंदी नंतर साखरपुड्याचे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. स्वानंदी आणि आशीष यांचा साखरपुडा 23 जुलैला पुण्यात संपन्न झाला आहे. दोघांनी एकमेकांना रिंग घालत साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याच्या आउटफिट मध्ये दोघे खूपच सुंदर दिसत होते. दोघांनी ट्विनिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघेही खूपच आनंदी आणि खुश दिसत होते.

And We’re Engaged! असे कॅप्शन लिहीत दोघांनी फोटो पोस्ट केले आहेत. खुप साऱ्या कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहते आता लग्नाची वाट पाहत आहेत.

तुम्ही स्वानंदी आणि आशीषच्या लग्नासाठी उत्सुक आहात का? तुम्हाला स्वानंदी आणि आशीषची जोडी आवडते का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version