अभिनेता सोनू सूदने जॅकलिन फर्नांडिससोबत फतेह सेट वरचे मजेदार बीटीएस केले शेयर !

अभिनेता सोनू सूदने अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट फतेहच्या सेटवरील काही खास आणि तितक्याच मजेदार बीटीएस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आणि या फोटो ची तुफान चर्चा झाली याच कारण देखील तितकच छान आहे एक विशेष सह-कलाकार आहे या चित्रपटात सोनू सोबत दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस !

सोनू सूदने शेअर केलेले BTS ” ‘फतेह ” च्या सेटवरील अनेक गोष्टींची खास झलक देतात. सोनू ने त्याच्या पोस्टला हटके कॅप्शन दिले ” कधीकधी काही विद्यार्थी इतके लवकर शिकणारे असतात @jacquelinefernandez शेवटी मला माझ्या पुढच्या चित्रपटासाठी DOP सापडला. @ilcondor तुझी नोकरी धोक्यात आहे #fateh @vedish_naidu_photography”

या फोटो मधून सेटवर किती धमाल मजेदार वातावरण असत हे कळतंय. या फोटो मधून फक्त कलाकारांची मज्जा हायलाइट होत नाही तर कलाकार आणि क्रू यांच्यातील अनोखं नातं यातून दिसत. जशी जशी या चित्रपटाची उत्कंठा वाढत चालली आहे तसतसे प्रेक्षक ” फतेह ” च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनू च्या नव्या सिनेमाची जादू अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.

फतेह’ हा सोनू सूदचा आणि झी स्टुडिओसह होम प्रोडक्शन चा चित्रपट आहे. ज्यामध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य कलाकार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Leave a Comment

Exit mobile version