अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार

मराठी सिने इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये  विवाहबद्ध होणार आहे. सोनालीने दिवाळीनिमित्त आपल्या पतीसोबत काही खास फोटो शेअर करत काही खास पोस्टही लिहिली आहे. हे फोटो २०१८ मधील आहेत. जेव्हा ती अभिनेता सुबोध भावे यांच्या ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पुण्यात आली होती.

तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये अस लिहिल आहे ,’की पुढच्या वर्षीचा पाडवा As Mrs’ म्हणजेच पुढच्या वर्षी मिसेस होऊन तुमच्या समोर येणार. २ फेब्रुवारी २०१९ रोजी सोनाली आणि कुणालचा साखरपुडा दुबई येथे झाला होता. त्यानंतर सोनालीने १८ मे म्हणजेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी साखरपुड्याची बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. अद्याप सोनालीने तिच्या लग्नाची तारीख फिक्स केली नाही. लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हंटल जात आहे. मात्र याबाबत सोनालीने काही पूर्णपणे माहिती दिली नाही.

Tags: Sonalee Kulkarni and Kunal Benodekar Wedding

Leave a Comment

Exit mobile version