सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर दुसऱ्यांदा अडकल्या विवाह बंधनात!

सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने मराठी इंडस्ट्रीबरोबर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याची आणि मितालीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या आईबरोबर देखील फोटो पोस्ट करत असतो. त्याची आई सिंगल मदर आहे. सिद्धार्थ चांदेकर सध्या खुप चर्चेत आहे.

त्याच्या आईचे म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर यांचं नुकताच लग्न झालयं. सीमा चांदेकर यांचं लग्न हे दुसरं लग्न आहे. त्यांच्या नवऱ्याचे नाव नितीन असे आहे. याची माहिती स्वतः सिद्धार्थ आणि मितालिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. सिद्धार्थने आपल्या आईच्या फोटोला सुंदर असे कॅप्शन देखील लिहिले आहे.

Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life #उत्तरार्ध

मितालीने देखील आपल्या सासूबाईंना शुभेच्छा देऊन सुंदर असे कॅप्शन लिहिले आहे.

Happy married life सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? | consider myself extremely lucky की मी हे अभिमानाने म्हणू शकते. खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.

कलाकारांनी आणि सिद्धार्थ – मितालीच्या चाहत्यांनी सीमा चांदेकर आणि नितीन यांना खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. AtoZ मराठीकडून सीमा चांदेकरआणि नितीन यांना खुप साऱ्या शुभेच्छा!

Leave a Comment

Exit mobile version