सिद्धार्थ आनंद अभिनेता सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत त्याच्या मार्फ्लिक्स पिक्चर्स या बॅनरखाली करणार पुढील चित्रपटासाठी शूट!

पठाणच्या जबरदस्त यशा नंतर सिद्धार्थ आनंद 2023 मध्ये विविध बातम्यां मुळे सतत चर्चेत येत आहेत. अनेक नव्या विषयावर चित्रपट दिग्दर्शित करून भारतीय चित्रपट उद्योगातील मोस्ट वॉन्टेड दिग्दर्शक ठरले आहेत. ते सध्या त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘फाइटर’साठी शूटिंग करत असून दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन या अभूतपूर्व जोडीला ते पहिल्यांदा पडद्यावर आणत आहे.

Marflix Pictures साठी टेंटपोल प्रोडक्शन असणारा हा चित्रपट डायरेक्ट-टू-OTT रिलीज होईल आणि आता जयदीप अहलावत सैफ अली खानच्या विरुद्ध नायक म्हणून या चित्रपटात सामील झाला आहे ज्यामुळे सिद्धार्थ आनंदकडून आणखी एक अफलातून कास्टिंग बघायला मिळणार आहे. Marflix Pictures नेटफ्लिक्ससाठी सैफ अली खान स्टारर चित्रपटाची निर्मिती करत असून चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल करणार आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान पुन्हा एकत्र येत असल्याने आता पुन्हा या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सलाम नमस्ते या ब्लॉकबस्टर चित्रपटात या दोघांनी शेवटचे एकत्र काम केले होते. आणि सिद्धार्थ आनंद बॅंग बँग, वॉर आणि पठाण चित्रपटा नंतर आता हा नवा चित्रपट करण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळतात. वॉरमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांना पहिल्यांदा एकत्र आणले आणि या दोघांच्या ऑन-स्क्रीन उपस्थितीला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाले.

सिद्धार्थ आनंद सध्या बहुप्रतिक्षित ‘फाइटर’ वर काम करत असून ज्यात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर सारखे बडे कलाकार दिसणार आहेत.

Leave a Comment

Exit mobile version