नागराज मंजुळे काढणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर नवीन चित्रपट.

नागराज मंजुळे काढणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर नवीन चित्रपट.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. खास शिवजयंतीनिमित्तान नागराज मंजुळे यांनी ही बातमी आपल्या चाहत्यांला आणि शिवप्रमींना दिली आहे. ‘शिवयत्री’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. ‘शिवत्रयी’ नावावरून हा केवळ एकच चित्रपट नसून तीन चित्रपटांची सीरिज असणार आहे. ‘शिवाजी’… ‘राजा शिवाजी’… ‘छत्रपती शिवाजी’ अशी या चित्रपटांची नावं असणार आहेत.

नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा पहिला टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. ‘एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,’ असे कॅप्शन देऊन नागराज यांनी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. शिवयत्री या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे तर निर्माता सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल आहेत.

२०२१ मध्ये शिवयत्री सिरीज मधील पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सर्व चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Title: Shivaji Maharaj Triology movie announcement by nagraj manjule, ritesh deshmukh and ajay atul

Tags: Nagraj Manjule new movie on Shivaji Maharaj, Shivtrayi Movie, Nagraj Manjule shivaji maharaj movie, ritesh deshmukh movie on shivaji maharaj

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *