अभिनेता शशांक केतकर दिसणार नवीन भूमिकेत

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ ह्या मालिकेनंतर अभिनेता शशांक केतकर एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘पहिले न मी तुला’ ह्या मालिकेत अभिनेता शशांक केतकर झळकणार आहे.

ह्या मालिकेत शशांक केतकर सोबत माझा होशील ना ह्या मालिकेतील डॉक्टर सुयश म्हणजेच अभिनेता आशय कुलकर्णी देखील दिसणार आहे. याशिवाय तन्वी मुंडले ही नवीन अभिनेत्री आपल्याला ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एका young businessman च्या लुक मध्ये शशांक प्रोमोत दिसत आहे. ‘पहिले न मी तुला’ ही मालिका १ मार्च पासुन रात्री ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=wmSq4P8BdVY

Tags: Shashank Ketkar new serial pahile na mi tula, pahile na mi tula new serial

Leave a Comment

Exit mobile version