अभिनेत्री सायली देवधर आणि गौरव बुरसे यांचा विवाह संपन्न!

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणी आपल्या प्रेमाची कबूली देत आहेत तर कोणी विवाह बंधनात अडकत आहेत. अभिनेत्री  नेहा पेंडसे पाठोपाठच मालविका गायकवाड, परी तेलंग, दिशा दानडे या अभिनेत्री देखील लग्न बंधनात अडकल्या. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे ते म्हणजेच सायली देवधर. नुकतेच सायली ने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

सायली देवधर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘जुळून येती रेशीमगाठी, ‘नवरी मिळे नवर्‍याला’ या मालिकांमध्ये सायलीने काम केले आहे.

सायली देवधरने गौरव बुरसे सोबत लग्न केले आहे. गौरव हा एक संगीतकार आणि गायक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. १४ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात त्यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. सायलीच्या लग्नाचे फोटो सायलीची खास मैत्रीण अभिनेत्री प्राजक्ता माळी ने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सायली आणि गौरव या दोघांनाही त्यांच्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

Title: Sayali Deodhar And Gaurav Burse Marriage.

Sayali Deodhar and Gaurav Burse Wedding Photo

Tags: Sayali Deodhar Marriage, Sayali Deodhar Wedding, Sayali Deodhar Husband, Sayali Deodhar and Gaurav Burse wedding, Sayali Deodhar and Gaurav Burse Marriage, Sayali Devdhar Marriage, Sayali Devdhar Wedding, Gaurav Burse Marriage, Sayali Deodhar and Gaurav Burse

Leave a Comment

Exit mobile version